“आयुष्यभराच्या साथीसाठी योग्य जोडीदार.”
“2011 पासून सुंदर कहाण्या घडवत आहोत”
ब्राह्मण समाजासाठी नव्या सुविधांसह, नवे संकेतस्थळ आता आपल्या सेवेत!
आमच्याविषयी
आम्ही सारे ब्राह्मण या पाक्षिकाच्या माध्यमातून 2011 पासून सुयश वधू-वर सूचक मंडळ पहिल्या दिवसापासूनच ऑनलाईन संकेतस्थळाद्वारे (वेबसाईट) सुरु झाले. 2011 पूर्वी श्री. चंद्रकांत फडके व सौ. शशिकला फडके हे मंडळ चालवत होते. केवळ ब्राह्मण समाजासाठी सुरु केलेले हे वधू-वर मंडळ त्यांना वयोमानाने चालू ठेवणे शक्य नव्हते, अशावेळी ब्राह्मण समाजासाठी काम करणार्या पाक्षिकाच्या संचालकांकडे, सुयोग्य आणि चांगल्या हाती सोपवावे म्हणून आम्ही सारे ब्राह्मणकडे सुयशचे पूर्ण व्यवस्थापन आले. 2011 पासून शहरी आणि ग्रामींण भागातील ब्राह्मण समाजातील सर्व स्तरावरील कुटुंबांकडे, पौरोहित्य करणार्या गुरुजींकडे, शेती, उद्योग, व्यवसाय करणार्या उद्योजकांकडे तसेच छोट्या-मोठ्या पदांवर नोकरी करणाऱ्या अशा सर्वांकडेच हे पाक्षिक मोठ्या प्रमाणावर जात असे.
नोंदणी शुल्क
रु. 2000 /-
(यात सर्व ऑनलाईन सुविधा उपलब्ध)
रु. 3,200 /-
(यात सर्व ऑनलाईन सुविधेसह तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्थळे जुळवून / मॅच करुन दिसण्याची सुविधा)
रु. 4,500 /-
(यात सर्व ऑनलाईन सुविधेसह तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्थळे जुळवून / मॅच करुन दिसण्याची सुविधा असेल तसेच जन्मकुंडली पाहून तज्ज्ञ ज्योतिषांकडून सल्ला दिला जाईल)
* नाव नोंदणी 1 वर्षासाठी असून त्यानंतर प्रत्येक वर्षासाठी नुतनीकरण आवश्यक आहे.
* कोणत्याही कारणास्तव पैसे परत दिले जाणार नाही.
सेवा-वैशिष्ट्ये
- संपूर्ण ऑनलाईन सुविधा उपलब्ध. त्यानुसार स्थळे पाहणे व माहिती घेणे सहजशक्य. स्थळांचे फोटो व जन्मपत्रिका (कुंडली) ऑनलाईन पाहता येणार.
- सुयश संकेतस्थळावर नोंदणी व पॅकेजनुसार ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर पुढील 48 तासात लॉगिन आयडी देण्यात येईल. लॉगिन करणाऱ्यांनीच पासवर्ड तयार करायचा आहे.
- सर्वांना वापरता येण्यासारखे सहज सोपे संकेतस्थळ.
- प्रत्येक स्थळाची माहिती (जाहिरात) ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका मासिकात 2 वेळा प्रसिध्द केली जाईल.
- सुयोग्य स्थळांची जन्मकुंडली पाहून तज्ज्ञ ज्योतिषांकडून माहिती व सल्ला उपलब्ध.
- स्थळांची माहिती गोपनीय व सुरक्षित राहण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाची जोड.
वर
वधू
यशस्वी विवाह
एकूण वर्षांचा अनुभव
About
ब्राह्मण समाजातील सर्व शाखा, पोटशाखांची स्थळे सुयशकडे आहेत. यात कोकणस्थ (चित्पावन), देशस्थ यजुर्वेदी, देशस्थ ऋग्वेदी, सामवेदी, कऱ्हाडे, देवरुखे, दैवज्ञ तसेच सारस्वत ब्राह्मण यांची देखील भरपूर स्थळे आहेत. विविध सुविधा असलेल्या, अनेक बारकावे लक्षात घेवून पालकांना जास्तीत जास्ती माहिती देणाऱ्या, ऑनलाईन पध्दतीने स्थळांची अचूक जुळवणी (मॅचिंग) करणाऱ्या नव्या वेबसाईटमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे.
Contact us
पत्ता
ऑफिस नंबर 15, विष्णू प्रिया अपार्टमेंट,
ईशान हॉटेल वर, 5 मजला,
गणेशमळा, सिंहगड रोड,
पुणे 411030 महाराष्ट्र, इंडिया
संपर्क
82370 13940 | 99218 08575


