सुयश वधु-वर सूचक मंडळ
ब्राह्मण समाजासाठी नव्या सुविधांसह, नवे संकेतस्थळ आता आपल्या सेवेत!
आम्ही सारे ब्राह्मण या पाक्षिकाच्या माध्यमातून 2011 पासून सुयश वधू-वर सूचक मंडळ पहिल्या दिवसापासूनच ऑनलाईन संकेतस्थळाद्वारे (वेबसाईट) सुरु झाले. 2011 पूर्वी श्री. चंद्रकांत फडके व सौ. शशिकला फडके हे मंडळ चालवत होते. केवळ ब्राह्मण समाजासाठी सुरु केलेले हे वधू-वर मंडळ त्यांना वयोमानाने चालू ठेवणे शक्य नव्हते, अशावेळी ब्राह्मण समाजासाठी काम करणार्या पाक्षिकाच्या संचालकांकडे, सुयोग्य आणि चांगल्या हाती सोपवावे म्हणून आम्ही सारे ब्राह्मणकडे सुयशचे पूर्ण व्यवस्थापन आले. 2011 पासून शहरी आणि ग्रामींण भागातील ब्राह्मण समाजातील सर्व स्तरावरील कुटुंबांकडे, पौरोहित्य करणार्या गुरुजींकडे, शेती, उद्योग, व्यवसाय करणार्या उद्योजकांकडे तसेच छोट्या-मोठ्या पदांवर नोकरी करणाऱ्या अशा सर्वांकडेच हे पाक्षिक मोठ्या प्रमाणावर जात असे. 2020 च्या कोरोना काळानंतर अनेक उद्योग-धंद्यांनी आपल्या कामकाजात बदल केले, खर्चातही कपात केली आणि उद्योगांचे स्वरुपही बदलले. त्याचप्रमाणे आम्ही सारे ब्राह्मण (पाक्षिक) आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका (मासिक) यांचे एकत्रिकरण करुन आता नियमितपणे आम्ही सारे ब्राह्मणसह ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका हे मासिक प्रकाशित होत आहे. सुमारे 20 हजार वर्गणीदारांचा टप्पा ओलांडला आहे. या मासिकाच्या माध्यमातून सुयश वधू-वर सूचक मंडळात नोंदविलेल्या स्थळांची माहिती दरमहा प्रकाशित केली जाते. सोशल मिडीयाच्या माध्यमातून देखील सुयशची प्रसिध्दी सुरु असतेच. सुयशमुळे आजवर सुमारे 2 हजारांच्या आसपास लग्न जुळल्याची आनंदी पालकांची आमच्याकडे नोंद आहे. ही सर्व लग्ने यशस्वीपणे संसार करत आहेत, याचा सुयश टिमला विशेष आनंद वाटतो.
योग्य जोडीदार शोधणे ही प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. आता ब्राह्मण समाजातील मुला-मुलींसाठी विश्वासार्ह, सुरक्षित आणि सोपी विवाह जुळवणी सेवा उपलब्ध आहे. आमच्या संकेतस्थळावर नोंदणी करून आपल्या मुलगा किंवा मुलीसाठी योग्य स्थळ सहज शोधता येईल. या संकेतस्थळावर शिक्षण, व्यवसाय, कुटुंब पार्श्वभूमी, गोत्र, अपेक्षा इत्यादी माहितीच्या आधारे योग्य जुळणी केली जाते. वापरण्यास सोपे, सुरक्षित आणि गोपनीयतेची पूर्ण काळजी घेणारे हे व्यासपीठ आहे. सुयशने आता नव्या स्वरुपात अधिक आकर्षक स्वरुपात, विविध सुविधांसह नवीन संकेतस्थळ सुरु केले आहे.
ब्राह्मण समाजातील सर्व शाखा, पोटशाखांची स्थळे सुयशकडे आहेत. यात कोकणस्थ (चित्पावन), देशस्थ यजुर्वेदी, देशस्थ ऋग्वेदी, सामवेदी, कऱ्हाडे, देवरुखे, दैवज्ञ तसेच सारस्वत ब्राह्मण यांची देखील भरपूर स्थळे आहेत. विविध सुविधा असलेल्या, अनेक बारकावे लक्षात घेवून पालकांना जास्तीत जास्ती माहिती देणाऱ्या, ऑनलाईन पध्दतीने स्थळांची अचूक जुळवणी (मॅचिंग) करणाऱ्या नव्या वेबसाईटमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. ब्राह्मण वधू-वरांची भरपूर स्थळे असणारे विश्वासार्ह असलेल्या सुयशमध्ये आजच नोंदणी करा आणि आपल्या कुटुंबासाठी योग्य जीवनसाथी शोधण्याचा प्रवास सुरू करा!
विश्वासार्ह सेवा…सुरक्षित माहिती…केवळ ब्राह्मण समाजासाठी…सुयश वधू-वर सूचक मंडळ !
संचालक
सौ. माधुरी भालचंद्र कुलकर्णी,
संचालिका (सुयश वधू-वर सूचक मंडळ)
सुयश वधू-वर सूचक मंडळाच्या संचालिका म्हणून २०११ पासून कार्यरत आहेत. २०११ पासून आम्ही सारे ब्राह्मण हे पाक्षिक सुरु झाले तेंव्हापासून फक्त ब्राह्मण समाजासाठी असलेल्या सूयश वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून अनेक विवाह यशस्वीपणे संपन्न झाले आहेत. ब्राह्मण समाजातील विवाहाच्या समस्या, ग्रामीण भागात पौरोहित्य आणि शेती करणाऱ्या तरुणांच्या विवाहासाठी त्या अधिक संवेदनशीलपणे काम करतात. ब्राह्मण समाजातील मुलींच्या वाढत्या अपेक्षा आणि त्याकरिता पालकांचे समुपदेशन यासाठी देखील त्या काम करतात. यासंबंधीचे त्यांचे अनेक लेख देखील प्रसिध्द झाले आहेत. आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिकेच्या मार्केटिंग विभागाचे प्रामुख्याने काम त्या पाहतात. याशिवाय विविध सामाजिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो.
भालचंद्र वसंत कुलकर्णी
संचालक व संपादक (ओम एकविरा मिडीया प्रा. लि.)
आम्ही सारे ब्राह्मण या पाक्षिकाचे २०११ पासून संस्थापक संपादक आहेत. २०१८ पासून ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका या मासिकाचे देखील संपादक आहेत. पुणे शहरातील सुमारे ३५ ब्राह्मण संस्था, संघटनांच्या एकजुटीचे (सकल ब्राहमण समाज) समन्वयक आहेत. सुरुवातील दैनिक लोकसत्ता, सकाळ आणि तरुण भारतमध्ये कार्यरत होते. त्यानंतर २०११ पासून प्रकाशन, जाहिरात, जनसंपर्क, प्रसिध्दी आणि माध्यम सेवा या क्षेत्रात कार्यरत आहेत. सहकार भारती या सहकार चळवळीमध्ये काम करणाऱ्या संघटनेचे राष्ट्रीय प्रकाशन प्रसिध्दी प्रमुख आहेत. सारस अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष आहेत तर पुणे सहकारी बँकेच्या प्रशासक मंडळाचे सदस्य आहेत. याशिवाय मराठी नियतकालिक परिषदेचे संस्थापक आहेत. विविध सामाजिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. सुयश वधू-वर सूचक मंडळाच्या कार्यात त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. माधुरी कुलकर्णी यांच्याबरोबरीने ते कार्यरत आहेत.
About
Contact us
पत्ता
ऑफिस नंबर 15, विष्णू प्रिया अपार्टमेंट,
ईशान हॉटेल वर, 5 मजला,
गणेशमळा, सिंहगड रोड,
पुणे 411030 महाराष्ट्र, इंडिया
संपर्क
82370 13940 | 99218 08575